सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (07:52 IST)

सहायक पोलिस आयुक्तांचा कुत्रा चोरणा-यास अटक

पुणे शहर पोलिस दलाचे सहायक पोलिस आयुक्त तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी परदेशी कुत्रा पाळला आहे. अमेरिकन बुलडॉग जातीचा पाळलेला परदेशी कुत्रा चोरीला गेल्याचे समजताच सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी लष्कर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली.
 
बड्या अधिका-याची कुत्रा हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलिस यंत्रणा तत्परतेने कामाला लागली व कुत्र्यासह चोराला ताब्यात घेण्यात आले. चोरीला गेलेला बुलडॉग बंगल्यातून बाहेर निघून गेला होता. विदेशी कुत्रा रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे बघून चोरट्यांनी त्याला पळवून नेले. तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही तपासले असता कैलास चव्हाण व त्याच्या साथीदाराने कुत्र्याला पळवून नेल्याचे समोर आले. हडपसर परिसरातून कैलास व त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली.
 
शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त वियज चौधरी यांचे अमेरिकन जातीचे ६० हजार रुपये किमतीचे श्वान चाेरट्यांनी पळवून नेले होते. लष्कर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत चोरट्यांना पकडून श्वान त्यांच्या ताब्यात दिले. चोरट्यांनी हे श्वान हडपसर येथील एकाला विकले होते.सहायक आयुक्त विजय चौधरी हे लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात शासकीय निवासस्थानी राहतात. त्यांचे पाळीव श्वान घराबाहेर आले असताना दुचाकीवरील चोरट्यांनी ते पळवून नेले.