गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (16:24 IST)

वयाच्या 81 व्या वर्षी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

balaji tambe
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Balaji Tambe) यांचे 81 वर्षांच्या वयात निधन झाले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांनी योग, आयुर्वेद आणि संगीतोपचार याच्या बाबत महाराष्ट्रासह देशा-परदेशात काम केले आहे. लोणावळा जवळ कार्ले येथे त्यांनी 'आत्मसंतुलन व्हिलेज' ची देखील स्थापना केली आहे. आजही तेथे आयुर्वेद उपचार केले जातात.

दरम्यान सुदृढ नव्या पिढीसाठी बालाजी तांबे यांनी ''गर्भसंस्कार' या पुस्तकाचे लेखन केले त्यानंतर इंग्रजी भाषेतही त्याचे अनुवाद झाले. यासोबत अन्य सहा भाषांमध्येही अनुवाद झाले आहे. सकाळ वृत्तपत्रासोबत बालाजी तांबे काम करत होते. 'फॅमिली डॉक्टर' हे त्यांचे सदर विशेष गाजले. जनसामान्यांना अत्यंत साध्या शब्दात आयुर्वेदाची महती, महत्त्व पटवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते त्यांच्याकडे उपचारांसाठी कार्ला ला आले होते.