शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (17:28 IST)

17 वर्षानंतर मेस्सी बार्सिलोनापासून वेगळा झाला, एका युगाचा अंत झाला

स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीने 17 वर्षानंतर बार्सिलोना क्लबपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि एका युगाचा अंत झाला आहे. मेस्सी क्लबसोबत राहणार नाही, असे बार्सिलोनाने गुरुवारी सांगितले. क्लबने म्हटले की स्पॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे अर्जेंटिना स्टारशी नवीन करार करणे अशक्य झाले.
 
मेस्सीने बार्सिलोनासह यशाची नवी उंची गाठली आहे. त्याने अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली. बार्सिलोना म्हणाला की नवीन करारावर बोलणी झाली आहे परंतु मेस्सीला आर्थिक अडचणींमुळे क्लबमध्ये राहणे शक्य नाही.
 
"क्लब आणि मेस्सी यांच्यात समझोता झाला, परंतु आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे ते शक्य झाले नाही," असे क्लबने म्हटले आहे. मेस्सीने गेल्या हंगामाच्या अखेरीस क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु तत्कालीन अध्यक्ष जोसेफ बार्टोम्यू यांनी ती नाकारली होती.

मेस्सीचा करार 30 जून रोजी संपला होता.दोन्ही पक्षामध्ये बोलणी यशस्वी न झाल्याने मेस्सीला बार्सिलोनाला निरोप द्यावा लागला.

या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो खूपच भावुक झाला आणि त्याचे अश्रू अनावर झाले.'मला आज काय बोलावं हेच समजत नाही,'असे म्हणत त्याच्या अश्रूंना बांधा फुटला.'मी आज 21 वर्षा नंतर पत्नी आणि मुलासह क्लब ला अखेरचा निरोप देत आहे'.मेस्सीच्या योगदानासाठी बार्सिलोनाने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.