पहिलं वहिल सुवर्ण पदक हे
फळला आले तप सऱ्यांचे,
स्वप्न पूर्ण अवघ्या भारताचे,
पहिलं वहिल सुवर्ण पदक हे,
झाले आकाश ठेंगणे अवघे,
कुठं ठेऊ कुठं नको नीरज ला,
वाटे मज हा सपुत आपुला,
काय वर्णावा आजचा दिन खरा,
माना न उंचा वल्या सर्वच नजरा,
शाब्बास रे हे भारताच्या मुला ,
आशीर्वाद पाठीशी, अन कौतुक तुला!!
सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल,
दिवस सोन्याचा सदैव लक्षात राहील!
"नीरज चोपडा"चे हार्दिक अभिनंदन!!
...अश्विनी थत्ते