सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:22 IST)

शाळेत पालकांना मारहाण

school
पुण्यातील एका शाळेत महिला बाऊन्सरकडून पालकांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत पालकांना मारहाणफी भरण्याबाबत तक्रार घेऊन संबंधित पालक शाळा गाठले होते. यावेळी शाळेच्या खासगी बाऊन्सर्सनी त्यांना गेटवर अडवून मारहाण केली. फीबाबत विचारणा केली असता पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाबाबत अजूनही शाळेकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत ही घटना घडली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठ त्यांना पत्र दिलं होतं. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते. या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणं दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचं मंगेश गायकवाड यांनी तक्रारीत म्हटलं आहे.