शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (14:04 IST)

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

भोसरीचे विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शनिवारी उदयकुमार राय नावाच्या माणसाने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मला मिळाली असे सांगितले. त्या नंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याला अटक केली. 

पोलिसांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी उदय कुमार हा गेल्या पाच वर्षांपासून भोसरी परिसरात राहत असून तो मुळात छत्तीसगडचा आहे. त्याने हा फोन का केला याचा तपास भोसरी पोलीस करत आहे. 

भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने भाजपच्या गटात खळबळ माजली आहे. या पूर्वी देखील लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजले आहे. एका अज्ञाताने त्यांच्याकडून 30  लाखाची खंडणी मागत लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महेश लांडगे यांनी जनतेच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी एक हेल्पलाईन सुरु केली  असून त्यावरून त्यांना धमकी दिली होती.पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit