शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (12:27 IST)

पुण्यातील मुंडवा परिसरात हिट अँड रन प्रकरणात दुचाकीस्वाराचा मृत्यू

महाराष्ट्रातील पुण्यात हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. मुंडवा परिसरात पहाटे दोनच्या सुमारास एका लक्झरी कारने धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातांनंतर कर चालकाने घटनस्थळून पळ काढला.हडपसर पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. 
 
मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी कारचालकाने दुचाकीला धडक देण्यापूर्वी इतर दोन वाहनांना देखील धडक दिली या अपघात तिघे जखमी झाले. नंतर पुढे आल्यावर त्याने दुचाकीला धडक दिली त्यात रऊफ शेख नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.
 
अपघातांनंतर आरोपी कार चालक पसार झाला. मात्र सीसीटीव्ही फुटेज मधून त्याची ओळख झाली नंतर त्याला हडपसर भागातून पोलिसांनी अटक केली  असून आरोपीवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit