मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (13:16 IST)

नशेत कार बीआरटीच्या बस स्टॉपला धडकल्याने दोघांचा मृत्यू

येरवडा- नगर रस्त्यावरील खराडी चौकात बीआरट बस स्टॉपला चारचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले.
 
संकेत भुजबळ वय 22 रहिवासी साईगरी, चंदननगर व त्याच्या शेजारी बसलेला ओम राहुल पवळे वय 17 रहिवासी किनारा सोसायटी कसबा पेठ या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
 
कारमध्ये मागे बसलेले गौरव साठे आणि प्रफुल अंकमनची हे दोघे गंभीर जखम झाले आहेत. मद्यधुंद चालकामुळे अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात पुण्याकडून नगरच्या दिशेने येणार्‍या कारने भरधाव येत बस स्टॉपला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार स्टॉपच्या मध्यभागी असणार्‍या जागेत जाऊन अडकली. जखमी युककांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
या प्रकरणी विमानतळ पोलिस स्टेशन येथे प्रकरण दाखल केलं गेलं आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.