शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (10:09 IST)

कांग्रेस नेते राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कांग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्याच्या रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. रणदीप सुरजेवाला यांनी ही बातमी ट्विटरवरून दिली. राजीव सातव यांच्या वर पुण्याच्या रुग्णालयात उपचार सुरु होते.काही दिवसा पूर्वीच ते कोरोनाने मुक्त झाले होते पण त्यांना सायटोमेगॅलो या नवीन विषाणूचा संसर्ग झाला होता अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. "आज मी एक सहयोगी गमवला ज्याने युवक काँग्रेसपासून माझ्यासोबत सुरुवात केली आणि आजपर्यंत साथ दिली. राजीव सातव यांचे हसणे, त्यांचे नेतृत्व, जमिनीवर असलेला व्यक्ती, पक्षाशी निष्ठा आणि मैत्री कायम आठवणीत राहिल."असे रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले "