21 नामांकीत रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची ‘लुटमार’

pune municipal corporation
Last Modified गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (08:59 IST)
वाढीव बिले आकारून कोरोनाबाधित रुग्णांची लुटमार करणा-या पिंपरी-चिंचवडमधील 21 नामांकीत रुग्णालयांचे पितळ उघडे पडले आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेल्या कोरोनाबाधीत निष्पाप लोकांकडून अवास्तव बिले आकारून या रुग्णालय व्यावस्थापनानी राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या सर्व रुग्णालयांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नोटीस बजावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत खासगी रुग्णालयांना कोविड 19 विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रुग्णांना माफक दरात उपचार देण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यासोबतच कोरोनाबाधीत रुग्णांचा दैनंदीन डेटाही कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही खासगी रुग्णालयांनी याचा गैरफायदा घेऊन कोरोनाबाधीत रुग्णांवर केलेल्या उपचाराचे अवास्तव शूल्क आकारल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये शहरातील 21 नामांकीत रुग्णालयांचा समावेश आले.
अवास्तव बिले अकारणा-या रुग्णालयांची नावे

यामध्ये साईनाथ हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, आयुष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टर्लिंग हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल (निगडी), आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेहरूनगर), जीवनज्योती हॉस्पिटल (काळेवाडी), फिनिक्स हॉस्पिटल (थेरगाव), अंगद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (भोसरी), ऑक्सिकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लाईफपॉईंट हॉस्पिटल (वाकड), अॅकॉर्ड हॉस्पिटल, मेट्रो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (रहाटणी), देसाई अॅक्सिडंट अॅण्ड जनरल हॉस्पिटल आदी रुग्णालयांचा सहभाग आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी कोवाक्सिनचा डोस अजिबात घेऊ नका - भारत बायोटेकने फॅक्टशीट प्रसिद्ध केले
Covid Vaccine Update: बरेच लोक भारत बायोटेकच्या औषध नियंत्रक ऑफ इंडिया कोव्हॅक्सिन 19 लस ...

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता या ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम
उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने ...

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...