1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Devendra ji should stay in Maharashtra Amruta Fadnavis's reaction

"देवेंद्रजींनी महाराष्ट्रातच राहावं!" – दिल्लीतील चर्चांवर अमृता फडणवीस पुन्हा बोलल्या; राजकीय वर्तुळात वक्तव्याची जोरदार चर्चा

पुण्यातील 'ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार' सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांवर आणि सुनेत्रा पवार यांच्यावरील राजकीय टीपेवर भाष्य केले.
 
देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील चर्चांवर प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीस म्हणाल्या की, त्यांना देवेंद्रजींना दिल्लीत पाहायला आवडणार नाही.
 
देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सेवा करत आहेत आणि ती जबाबदारी ते अतिशय चांगल्या प्रकारे निभावत आहेत, असे त्या म्हणाल्या.
 
सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडीया' टीकेचा समाचार
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांचे समर्थन केले. त्या म्हणाल्या की, सुनेत्रा पवार एक सक्षम स्त्री आहेत आणि त्या नेहमी अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.
 
 कुठे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे हे सुनेत्रा ताईंना व्यवस्थित माहीत आहे. काँग्रेस केवळ प्रसिद्धीसाठी (स्टंटबाजी) अशी टीका करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना 'ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
 
या कार्यक्रमात सुलज्जा फिरोदिया मोटवानी, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, वीरपत्नी सायली अर्जुन जाधव (शौर्य पुरस्कार) आणि इरफान मुजावर (मानवतावादी पुरस्कार) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले.
पुढील लेख
मध्य रेल्वेने तिकीटविरहित किंवा अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर नियम केले