सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (16:13 IST)

मैत्रीचा गैरफायदा अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार

पुणे : अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करुन एका तरुणाने तिच्याबरोबरच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार  केला.त्यानंतर ही 9 वर्षाची मुलगी आईसमवेत गोव्याला गेली.आता दोन वर्षानंतर या मुलीने आपल्यावर न कळत्या वयात घडलेल्या प्रसंगाची माहिती आईला दिली.त्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे.
 
हडपसर पोलिसांनी कुणाल पटेल  (वय २०,रा.फातिमानगर) याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याखाली (pocso act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान घडला होता.फिर्यादी यांच्या ९ वर्षाच्या मुलीशी कुणाल पटेल याने मैत्री केली.त्यातून तिच्याशी जवळीक साधून तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध (physical relation) ठेवले. त्यानंतर हे कुटुंब गोव्याला गेले. या मुलीने हा प्रकार आता आपल्या आईला सांगितला.त्यानंतर तिच्या आईने गोव्यातील (Goa) मापसा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली. तेथून ही फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.