गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 27 जून 2021 (11:52 IST)

'पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ'

कोरोनाच्या काळात आई किंवा वडिलांचं निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचं आणि यंदाचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतला आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची काल (26 जून) बैठक पार पडली. यात याबाबत निर्णय झाला.
 
दुसरीकडे, यंदा महाविद्यालयांकडून शुल्कवाढ केली जाणार असताना, त्यास स्थगिती देण्याबाबत विद्यापीठानं आयोजित केलेल्या या बैठकीत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीची टांगती तलवार कायम आहे.
 
कोरोना काळात घरातील कर्ता व्यक्ती गमावल्यानं अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या काळात विद्यापीठानं घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय.