शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (08:11 IST)

सीरमकडून कोवोवॅक्स लसीच्या उत्पादनाला सुरूवात

सीरम इन्स्टिट्यूटने पुण्यात कोवोवॅक्स(Covavax) लसीच्या उत्पादनात सुरूवात केली आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. सीरमनं आणखी एक शिखर गाठलं आहे असं पूनावाला म्हणाले. तसेच येत्या आठवडाभरात आम्ही कोवोवॅक्सची पहिली खेप बनवण्यास सुरुवात करतोय, जी अमेरिकेतील बायोटेक्नोलॉजी फर्म नोवावॅक्सकडून बनवण्यात आली आहे. तिचं भारतात नाव कोवोवॅक्स ठेवण्यात आलं आहे.
 
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट केले की, Covovax पहिल्या खेपीच्या उत्पादनासाठी मी उत्सुक आहे. येत्या आठवडाभरात पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये ही खेप तयार केली जाईल. ही लस १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनापासून संरक्षण देण्याची क्षमता ठेवतं. त्याचं ट्रायल सुरू आहे असं ते म्हणाले. नोवावॅक्सच्या चाचणीत पाहायला मिळत आहे की, ही वॅक्सिन SARS Cov2 मुळे होणाऱ्या मध्यम आणि गंभीर आजाराविरोधात ९०.४ टक्के प्रभावी ठरली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या करारानुसार नोवोवॅक्सने सीरमला (SII) कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसोबत भारतातही लसीचं उत्पादन आणि पुरवठा करण्याचा परवाना दिला आहे.