मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (07:49 IST)

न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन; तरुणाला आली आंदोलनाची धमकी

पुण्यात एका तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षय माळी असे या कलाकाराचे नाव आहे. व्यवस्थापनाने कोणाच्या तरी दबावाखाली राहून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास बंदी केली असल्याचा आरोप त्याने केला आहे.
अक्षय माळी हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्याने पुण्यातील सिम्बायोसिस स्कुल ऑफ फोटोग्राफी मधून शिक्षण घेतलं आहे. पुण्यात आतापर्यंत न्यूड फोटोग्राफिचे प्रदर्शन कधी झाले नाही. समाजाचा न्यूड फोटोग्राफी अथवा चित्रकला याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलण्यासाठी अक्षयने ही नवीन संकल्पना आणली होती. अक्षयचे पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात तीन दिवस प्रदर्शन पाहायला मिळणार होते. मात्र न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आली होती. मात्र शनिवारी पहिल्याच दिवशी त्याच प्रदर्शन बंद करण्यात आलंय… व्यवस्थापनाने कोणाच्या तरी दबावाखाली राहून नागरिकांना प्रदर्शन पाहण्यास बंदी केली असल्याचा आरोप त्याने केला.