गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

धक्कादायक! जन्मदात्या बापाकडून मुलीवर धारदार शस्त्राने वार, परिसरात खळबळ

crime news
पुण्याच्या वाघोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोलीत जन्मदात्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीची  हत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. लोणीकंद पोलिसांनी  बापाविरोधात गुन्हा दाखल केलाय. वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती नाही. पण वाघोली परिसरात  या खूनाबद्दल चर्चा सुरु आहे.
 
बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 15 वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असल्याचं समजतेय. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे राहतात, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.