मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (10:12 IST)

दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी वाहतुकीत बदल

dagdu seth ganapati
नववर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सोमवारी (1 जानेवारी) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. 
 
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे. जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) महापालिका भवनकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
 
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून गणेश रस्त्यावरुन दारुवाला पूलाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळामार्गे, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने जिजामाता चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
 
Edited by-Ratnadeep Ranshoor