मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (18:55 IST)

Pune : सिंबायोसिस कॉलेज जवळ 10 सिलेंडरचा मोठा स्फोट, सुदैवाने जीवित हानी नाही

पुण्यातील  विमाननगर भागात सिम्बायोसिस कॉलेज जवळ आज दुपारी 10 सिलिंडरचा मोठा स्फोट झाला असून सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनास्थळी 100 सिलिंडर होते त्यात 10 सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. 

सदर घटना लेबर कॅम्प शेजारी असलेल्या पत्राच्या शेडमध्ये भरत गॅस कंपनीचे 100 गॅस सिलिंडर ठेवले होते. दुपारची वेळ असल्याने तिथे कामगार नव्हते. सुदैवाने जखमी व जीवितहानी टळली.स्फोट एवढे भयंकर होते की स्फोटांनंतर सिलिंडर हवेत तब्बल 100 फूट उंच उडाले. 

घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाची 3 वाहने पोहोचली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच अग्निशमन दलाचे बंब पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

या ठिकाणी 100 सिलिंडर होते. सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे
 
Edited By- Priya DIxit