1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (16:49 IST)

परदेशी तरुणीचा पुण्यात विनयभंग!

South Korean Vlogger Kelly Got Harassed In India
साउथ कोरियाची युट्यूबर तरुणीची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत घृणास्पद प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. 
 
कैली नावाच्या कोरियन तरुणीचे तिच्या युट्यूब चॅनेलवर 1.69 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. कैली पर्यटनासाठी भारतात आली आहे. भारतातील पर्यटनाचा व्हिडिओ पोस्ट करत तिने त्यावर एक कॅप्शनही दिले ज्यात तिने म्हटले की तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला वाईट माणसांचे अनुभवही येतात.
 
ती सोलो ट्रॅव्हलर म्हणून भारतात एकट फिरत असल्याचे म्हणाली. तिने पुढे व्हिडिओत असे देखील म्हटलं आहे की या प्रसंगावरुन व काही लोकांच्या वर्तवणुकीवरुन भारतीयांबद्दल मत तयार करु नका. 
 
खरं तर तरुणी रस्त्यावर फिरत काही स्थानिक लोकांबद्दलही माहिती गोळा करत होती. तेव्हा एका दुकानापाशी आल्यानंतर लोकांची विचारपूस करत असतानाच एक तरुण अचानक समोर आला आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्या खांद्यावर आणि नंतर गळ्यात हात टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला असून परिसर बघता हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे सांगण्यात येतं आहे. 
 
भारतात आलेल्या परदेशी पर्यटक तरुणीशी या प्रकारे झालेल्या गैरवर्तनावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून अनेकांनी भारतीय म्हणून कमेंटमध्ये माफी मागितली आहे.