गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (20:38 IST)

मंदिरात जाताना माणसाचा समोर अचानक वाघ आला आणि ...

tiger
वाघाचे नाव घेताच डोळ्या समोर दिसतो विशाल हिंसक प्राणी. कल्पना करा की आपण कुठे चाललो आहोत आणि तेवढ्यात समोर वाघ आला मग काय होणार.नक्कीच वाघाचे भक्षण होणार. अशी कल्पना जरी केली तरीही अंगाचा थरकापचं होतो.

पण सध्या सोशल मीडियावर उत्तराखंडचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना चांगलाच घाम फुटला आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडचा असून या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती हातात बॅग घेऊ एका मंदिराकडे जात असताना दिसत आहे. तेवढ्यात तिथे त्याचा समोर एक वाघ आला आणि मग वाघाला पाहून तो व्यक्ती घाबरतो. मात्र सुदैवाने वाघ त्याला पाहत नाही आणि तो निमूटपणे आपल्या मार्गाने निघून जातो. 

हा व्हिडीओ जिम कार्बेट नॅशनल पार्कच्या जवळच्या परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ 41 सेकंदाचा आहे. या व्हिडिओला लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मृत्यूला समोर बघणे असे लिहिले आहे. तर एकाने या माणसाला भाग्यवान असे म्हटले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit