रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:02 IST)

बस स्थानकात आढळले अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक

पुण्याच्या चाकण बस स्थानकातून अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले. हे अर्भक एका रिक्षा चालकाला आढळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुजित अजित काळे  हे रिक्षाचालक सोमवारी सकाळी आपल्या मित्रा विनोद भगवान हजारे सह चाकण बस स्थानकाजवळ रोडवर रिक्षा लावून उभारले असता त्यांना येथील एका इलेक्ट्रिक च्या दुकानाकाजवळ लोकांची गर्दी जमलेली दिसली. ते  तिथे गेल्यावर त्यांना एका स्त्री जातीचे नुकतेच जन्मलेले अर्भक आढळले. त्यांनी त्या अर्भकाच्या नाते संबंधीचा शोध घेतला तरी त्यांना कोणीही सापडले नाही. सदर अर्भक अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे असे त्यांना लक्षात आले . त्यांनी अर्भकाला आपल्या रिक्षेतून चाकण पोलीस ठाण्यात आणले आणि फिर्याद नोंदवली. चाकण पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.