शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , रविवार, 15 मार्च 2020 (12:07 IST)

पुण्यात लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

Fire breaks
पुण्यात लाकडी फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात धुराचे मोठमोठे लोण पसरल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वास 
 
घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, या भागात अनेक फर्निचरची दुकाने असल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले होते.