शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (16:49 IST)

नियम धाब्यावर ठेऊन पुण्यात गणपती विसर्जनात ढोल ताशे सह मिरवणूक काढली

आज सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता गर्दी न करता साध्या पद्धतीने विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.तरी ही काही मंडळे नियमांचे उल्लंघन करत असताना दिसत आहे.मानाच्या गणपतीचे विर्सजन देखील उत्सव मंडपात करण्याचे निर्णय घेतले गेले होते.
 
पण पुण्याच्या मानाच्या 5 गणपतीपैकी एक असलेल्या तुळशीबागेतील गणपतीच्या विसर्जनाला भाविकांची गर्दी आणि ढोल ताशांसह मिरवणूक बघायला मिळाली.या त्यानंतर ढोल ताश्यासह बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता यंदाच्या वर्षी अगदी साध्या पद्धतीने गणपती विसर्जन मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन पोलीस आणि राज्य सरकारने दिले होते.तरी ही नियमांना धता  देत  ढोल ताशांचा गजरात बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत नाचत देखील होते. 
पुण्यात देखील नियम मोडले असताना पोलिसांनी त्या स्थळी जाऊन कायदेशीर पद्धतीने ढोल ताशे पथकाला रोखले आणि कार्यकर्त्यांना कारवाई करण्याचे संकेत देऊन ढोल ताशा साहित्ये जप्त केले.यावर पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.पण नंतर मंडळाचे विश्वस्तांनी विनंती केल्यावर पोलिसांनी त्यांना ताकीद देऊन कोणतीही कारवाई न करण्याचे सांगितले.