गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (22:01 IST)

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून २२ लाखांच्या मोटारी पेटवून दिल्या

पिंपरी-चिंचवड शहरात कामावरून काढून टाकल्याच्या रागातून तरुणाने आणि त्याच्या भावाने क्रेटा आणि इनोव्हा अशा २२ लाखांच्या मोटारी पेटवून दिल्या आहे.या प्रकरणी ६० वर्षीय महिलेने भोसरी MIDC पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद किसनराव भस्के अस वाहन चालकाचे नाव असून त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले आहोत. तर, अंकित किसनराव भस्के असे त्याच्या भावाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून वाहनचालक (ड्रायव्हर) म्हणून काम करत होता.दरम्यान, विनोद याने फिर्यादी यांची दुसरी मोटार (स्विफ्ट) ही गावाकडे जायचं म्हणून दहा दिवसांसाठी घेऊन गेला.मात्र,महिना झाला तरी मोटार आणून दिली नाही.त्यामुळं फिर्यादी यांनी त्यांचा शोध घेऊन ते त्याच्या घरापर्यंत पोहचले.
 
मोटारी विषयी विचारले तेव्हा त्याचा भाऊ अंकित याने त्यांच्याशी वाद घातला, फिर्यादीत म्हटलं आहे. नंतर तीच स्विफ्ट नुकसान करून आणून दिले असे फिर्यादीने म्हटलं आहे.त्यानंतर विनोदला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी आरोपी विनोद आणि त्याचा भाऊ अंकित यांनी फिर्यादी राहात असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन क्रेटा आणि इनोव्हा गाड्या पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.