शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (16:46 IST)

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

शिवसेनेचे माजी खासदार हवेलीचे माजी आमदार गजानन धरमशी बाबर यांचे वयाच्या 79 व्या वर्षी आजाराने निधन झाले. मागील दीड महिन्यापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना उपचारासाठी पुण्यातील बाणेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण लागली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ते व्हेंटिलेटर सपोर्टवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले दोन बंधू, तीन बहिणी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर निगडी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.