खूशखबर! आज होणार पुणे मेट्रोची ट्रायल रन
मेट्रोच्या कामाला वेग आला असून वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावरील ट्रायल रन शुक्रवारी होणार आहे. महामेट्रो प्रकल्पांतर्गत पुण्यात मेट्रोचे काम सुरू आहे.या बाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.
मोहोळ म्हणाले,मेट्रोकडून चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे. मेट्रोची चाचणी आजच होणार असल्याची शक्यता आहे. वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो मार्गाची चाचणी (ट्रायल रन) शुक्रवारी सकाळी घेण्यात येणार आहे. वनाज ते आयडियल कॉलनी या मेट्रो मार्गाची चाचणी होणार आहे.
पंधरा दिवसांपूर्वी वनाज ते आयडीयल कॉलनी या टप्प्यामध्ये मेट्रोची पूर्व चाचणी यशस्वी पणे घेण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड पाठोपाठ वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान 3.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली.
महामेट्रोने वनाज ते गरवारे या 5 किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वास आणले आहे. या मार्गावरील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यातील दोन्ही मार्गावरील मेट्रोचे हे डबे इटलीतील कारखान्यातून आणण्यात येणार आहेत. हे विशेष प्रकारच्या हलक्या आणि कडक अशा धातूपासून बनवले आहेत.