शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:13 IST)

लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार

लग्नासाठी तगादा लावणार्‍या प्रेयसीचा काटा काढण्यासाठी तिला फार्महाउसवर घेऊन जात तिच्या मानेवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तिच्या डोक्यात जड वस्तू ने प्रहार देखील करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सासवड रस्त्यावर 16 ऑगस्टच्या रात्री हा प्रकार घडला.अरिफ इसाक शेख (वय 29, मेयफेअर एलीगेट, कुमार पिनॅकल सोसायटी समोर ताडीवाला रोड पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. 27 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मागील काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. फिर्यादीने आरोपीला वेळोवेळी अकरा लाख रुपये देखील दिले होते. दरम्यान मागील काही दिवसांपासून फिर्यादी या आरिफ शेख याने लग्न करावे म्हणून तगादा लावत होत्या.
 
दरम्यान आरोपी आरिफ शेख याने लग्न करावे लागू नये आणि घेतलेले पैसे परत द्यावे लागू नये यासाठी फिर्यादीला ठार मारण्याचा कट रचला. सासवड रस्त्यावर असलेल्या एका बंद फार्महाऊसमध्ये जेवणासाठी जाण्याच्या बहाण्याने तिला घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने जड वस्तूने तिच्या डोक्यात प्रहार केला. तर चॉपर सारख्या हत्याराने तिच्या मानेवर, गळ्यावर, हातावर आणि दंडावर वार करून गंभीर जखमी केले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.