पुण्यात कारमध्ये हेल्मेट न घातल्याने दंड ठोठावण्यात आला
पुण्यात वाहतूक विभागाची कारवाई सुरु असल्यामुळे पुणेकरांमध्ये चांगलीच धास्ती बसली आहे. नियम तोडल्यावर चालकांना ई चलन पाठवण्यात येत आहे. दंड न भरल्यास नोटिसा पाठवल्या जातात. अशात एक मजेदार पण धक्कादायक बातमी म्हणजे एका व्यक्तीवर कारमध्ये हेल्मेट न घातल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.
एकाकडे मारुती सुजुीकची एस एक्स 4 ही कार आहे आणि वाहन मालकाला 9 जानेवारी 2019 हा दंड करण्यात आला आहे. नागरिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा येत असल्याने गाडी मालकाने त्याच्या गाडीवरील दंड चेक केल्यानंतर त्यांना हेल्मेट न घातल्याने 500 रुपये आणि पोलिस नियम तोडल्याने 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहन चालकाला पाठवण्यात आलेल्या चलनावर हेल्मेट न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे; शिवाय त्यांच्या चारचाकी गाडीचा क्रमांकही त्यात लिहिण्यात आला आहे. गाडी मालकाने कारला वाहतूक विभागाने हेल्मेटचा दंड कसा लावला याबद्दल प्रश्न केला आहे.
photo: symbolic