शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified मंगळवार, 22 जून 2021 (19:06 IST)

पुण्यात एका पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे ग्रामीण पोलीस दलात असलेल्या एका शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.या मयत शिपायाचे नाव रज्जाक मोहम्मद मणेरी असं आहे.हा शिपाई पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनात कार्यरत होता. सध्या पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. 
 
रज्जाक इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवासी होता.रज्जाकच्या नातेवाईकांनी कामानिमित्त त्याला बरेच फोन केल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्याने फोन उचलले नाही त्यामुळे नातेवाईकांना काळजी वाटली आणि ते त्याच्या राहत्या घरी गेले असताना त्यांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले.
 
या घटनेची त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांनी पंचनामा केल्यावर त्यांना मयत असलेल्या रज्जाकच्या शेजारी एक सुसाईड नोट सापडली त्यात त्याने 'सॉरी मॉम' असे लिहिले होते.गळफास घेण्यापूर्वी त्याने नस कापून घेतली नंतर गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे.त्याने हे पाऊल का उचलले अद्याप काही माहिती मिळालेली नाही.पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास घेत आहे.