1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (17:40 IST)

पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळ आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेस ही ऐतिहासिक इमारत आहे,ही इमारत पुण्याच्या येरवडा येथे आहे.ही इमारत सुलतान मुहम्मद शाह आगा खान द्वितीय यांनी 1892 मध्ये बनविली होती.या इमारतीत महात्मा गांधी आणि त्यांच्या साथीदारांना 1942 मध्ये बंदिस्त केले होते.कस्तुरबा गांधी यांचे निधन इथेच झाले.त्यांची समाधी देखील इथेच आहे.आता या इमारतीत एक संग्रहालय केले आहे.
ही इमारत 6.5 हेक्टयर मध्ये पसरलेली आहे.1892 मध्ये या इमारतीला आगा खान तृतीय यांनी बनविले होते.सुमारे 1956 पर्यंत ही इमारत त्यांच्याच जवळ होती नंतर 1969 मध्ये आगा खान चतुर्थ यांनी भारत सरकारला देणगी स्वरूपात दिली.महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तूरबा गांधी आणि महात्माजींचे सचिव महादेवभाई देसाई येथे 2 वर्ष वास्तव्यास होते. याच दरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या अस्थी या इमारतीच्या बगिच्यात ठेवल्या आहेत.गांधीजींच्या जीवनावर आधारित असलेले चित्र आणि त्यांच्या वैयक्तिक वापराच्या काही वस्तू चष्मा,चपला,येथे ठेवल्या आहेत.  
या इमारतीत महात्मा गांधी यांनी आपला दोन वर्षाचा तुरुंगवास येथेच घालवला.
 
आगा खान महालाचा इतिहास-
1982 मध्ये पुण्याच्या लोकांना काम देण्यासाठी आगाखान महालाचे निर्माण केले गेले.त्यामुळे या महालाच्या वास्तू मध्ये दयाभाव आणि चांगले विचार दडलेले आहेत.या महालाचे क्षेत्र 19 एकरावर पसरलेले असून  7 एकरच्या भूमीवर या महालाचे निर्माण केले आहे.हे महाल बनविण्यासाठी 1000 कामगारांना सुमारे पांच वर्ष लागले आणि बांधकामासाठी बारा लाख रुपये खर्च आला.
 
आगा खान महाल आणि महात्मा गांधी -
ऑगस्ट 1942 ते मे 1944 पर्यंत आपल्या तुरुंगवासाच्या काळात महात्मा गांधी याच महालात आपल्या पत्नी कस्तुरबा,सहायक महादेव देसाई आणि स्वातंत्र्य वीर नायडू यांच्या समवेत राहिले.कस्तुरबा आणि महादेव देसाई यांचे निधन याच महालात तुरुंगवासाच्या काळातच झाले.महालाच्या एका कोपऱ्यात या दोघांची समाधी आहे. वास्तविक ते समाधी स्थळ नसून त्या स्थळी कस्तुरबा गांधी आणि देसाई यांचे दाह संस्कार केले होते.आणि त्या जागी तुळशीचं रोपटं लावले आहे.कस्तुरबा गांधींच्या समाधी स्थळाच्या जवळच्या लाल भिंतीवर त्यांना एक मराठी कविता लिहून समर्पित केली आहे.     
जर आपल्याला शांततेत फिरायचे असल्यास या महालापेक्षा इतर कोणतीही जागा नाही.या इमारतीच्या आजू बाजूला मोठे मोठे झाडं आहे.हेच झाडे या परिसराचे आणि महालाचे सौंदर्य वाढवतात.हा महाल फिकट पिवळ्या रंगासाठी आणि आपल्या लाल ढलावदार छतामुळे सुंदर दिसतो.
 
गांधी संग्रहालय -
गांधीजी ज्या खोल्यांचा वापर करायचे त्यांना आता संग्रहालयात रूपांतरित केले आहेत.या खोल्या साधारण आणि स्वच्छ आहेत.त्यामध्ये गांधीजींच्या वापरण्यातल्या वैयक्तिक वस्तू भांडी,चपला,कपडे आणि पत्र ठेवले आहेत.
महालात प्रवेश करताच एका मोठ्या खोलीत गांधींजींचा पुतळा आहे.गांधीजींचे मोठे चित्र असे बनविले आहे जणू ते जिवंतच आहे.महात्मा गांधींजींच्या स्वातंत्र्य चळवळीतील काही छाया चित्रे देखील इथे आहेत.

दुसऱ्या खोलीत चित्राच्या माध्यमातून गांधीजींनी एका लहान मुलाला आपल्या मांडीवर घेतलेले दर्शविले आहे.या इमारतीत रंगबेरंगी चित्रांच्या माध्यमातून गांधीजींच्या आयुष्यातील घटनांना चित्रित केले आहे.
एका खोलीत खोलीच्या मधोमध एक गोल टेबल सात खुर्च्यांसह ठेवलेले आहे,त्या खोलीत देखील चित्र आहेत.हे सुरक्षित ठेवले आहे,जेणे करून कोणी त्यांना स्पर्श करू नये.
 
आगा खान महालातील इतर काही मनोरंजक गोष्टी- 
या व्यतिरिक्त आगा खान पॅलेस मध्ये एक ग्रँथालय,गांधी साहित्य विक्री करणारे दुकान,खादी ग्रामोद्योग दुकान महिला प्रशिक्षण केंद्र,यूएन एचआरसी कार्यालय,मुलांसाठी फिल्मी क्लब इत्यादी आहेत.
  
आगा खान पॅलेस मध्ये साजरे केले जाणारे उत्सव -
24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका बाल दिन
26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन
30 जानेवारी - गांधीजींची पुण्यतिथी
 8 मार्च - महिला दिन
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
2 ऑक्टोबर - गांधी जयंती
14 नोव्हेंबर - बालदिन 
 महाशिवरात्री इत्यादी सण साजरे केले जातात.