पुण्यात तरुणीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने चाकूने वार करून केली हत्या  
					
										
                                       
                  
                  				  पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात एका 21 वर्षीय तरुणीचा एका 22 वर्षीय तरुणाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राची माने असे या मयत तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पकडले असून अविराज खरात असे त्याचे नाव आहे. 
				  													
						
																							
									  
	
	मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी खेड तालुक्यातील आंबेठाणची रहिवासी असून  हे दोघे सांगलीत राहायचे. फार पूर्वी तिला आरोपीने लग्नाची मागणी केली होती.त्याला तरुणीने नकार दिला.यावर तरुणाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन तरुणीवर चाकूने वार करून निर्घृण खून केला.
				  				  या घटनेनंतर आरोपी अविराज साताऱ्याला पसार झाला. पोलिसांनी त्याला अवघ्या 12 तासांतच अटक केली. तो तिथूनपण पसार होण्याचा प्रयत्नांत होता. पोलिसांना तो साताऱ्यात असल्याचे कळल्यावर त्यांनी त्याला तिथून अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर पोलीस कोठडीत ठेवणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	Edited By- Priya Dixit