बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (19:10 IST)

पालिकेत किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, पायऱ्यांवरून पडले

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारमधील काही मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. आज पुण्यात महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचाराच्या संदर्भात महापालिकेकच्या आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आल्यावर त्यांच्यावर शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली .या मुळे ते पायऱ्यांवरून घसरून पडले. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना वेळीच गाडीत बसवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून देण्यात आले. त्यामुळे ते महापालिकेच्या आयुक्तांना न भेटताच निघाले. सध्या किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णांलयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

सोमय्या यांना मुका मार लागला आहे. त्यांच्या माकड हाडालादेखील मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
संचेती म्हणाले, "किरीट सोमय्या यांना रुग्णालयात आणलं त्यावेळी त्यांचा बीपी वाढलेला होता. पण आता नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही.
 
"त्यांच्या हाताला प्लास्टर केलं आहे. त्यांना आरामाची गरज आहे. एक दिवस निगराणीखाली ठेवून उद्या सुटी दिली जाईल."या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.