शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (12:05 IST)

दहावीच्या मराठी पेपरफुटी प्रकरणात प्रश्नपत्रिका हाताने लिहिल्याचा महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा दावा

maharashtra state board
Pune News : राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, यांच्या वतीने दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरु झाली असून पहिला पेपर मराठीचा होता.
या पेपर दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर पेपर फुटला . तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी परीक्षा केंद्रावर केंद्राच्या बाहेरील नागरिकांना प्रथम भाषेची मराठीची प्रश्नपत्रिका मोबाईल फोनवर व्हायरल झाली. या सर्व प्रकरणावर राज्य शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. 

पेपरफुटीच्या बातम्या प्रसारित झाल्यावर राज्य शिक्षण मंडळाने वस्तुस्थिती समोर आणली आहे. मंडळ म्हणाले, जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे परीक्षा केंद्रावर भेट दिल्यावर आम्ही मराठी भाषा विषयाची मूळ प्रश्नपत्रिका तपासली.
चौकशीत आढळून आले की, प्रश्नपत्रिकेतील दोन पाने मूळ प्रश्नपत्रिका नव्हती तर दुसऱ्या खाजगी प्रकाशकाने प्रकाशित केली होती. काही हस्तलिखित पाने देखील आढळली. याचा अर्थ असा की प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही. तर लोकांची दिशाभूल करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे लीक झाली आहे. 
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे परीक्षा केंद्रावर मराठी भाषेची प्रश्नपत्रिका लीक झाली आणि मोबाईलवर आली. संबंधित अधिकाऱ्यांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मिळाला असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात दोषी व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit