पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, उभारणार 550 कोटींचा लॉजिस्टिक पार्क
social media X
वेल्प्सन वन कंपनी कडून तळेगाव एमआयडीसीच्या चौथ्या टप्प्यातील 46 एकर जागेवर सुमारे 550 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून या प्रकल्पाअंतर्गत सुमारे 12 लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क विकसित केला जाणार आहे.
एमआयडीसी अधिसूचित केलेल्या या जागेचा वापर प्रीमियम ग्रेड-ए, फर्स्ट-माइल लॉजिस्टिक्स मालमत्ता विकसित करण्यासाठी केला जाणार आहे.
वेल्स्पन वनचा प्रस्तावित लॉजिस्टिक पार्क 45 मीटर रुंदीच्या एमआयडीसी मुख्य रस्त्यालगत असून, एमआयडीसी क्षेत्रात तीन बाजूंनी प्रवेश रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच आगामी वर्तुळाकार मार्गापासून हे ठिकाण केवळ 10 किलोमीटर, तर मुंबई–पुणे द्रुतगती मार्गापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांशी जलद आणि सुलभ दळणवळण शक्य होणार आहे.
Edited By - Priya Dixit
