शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (20:39 IST)

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

river
सध्या सर्वत्र पाऊस पडत आहे. नदी, तलाव ओसंडून वाहत आहे. कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवर सध्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सध्या वाहतूक जुन्या पुलावरून केली जात आहे. सध्या इंद्रायणी नदीची पातळी वाढली आहे. नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे.

शुक्रवारी पुलावरून जाताना एक व्यक्ती नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बचाव पथकाने त्याला शोधण्याची मोहीम राबवली.सध्या नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मुळे व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सापडू शकला नाही. 

कार्ला- मळवली दरम्यान इंद्रायणी वरील पुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. नागरिकांना या मुळे मोठ्या अडचणींना सामोरी जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर करण्याचे निवेदन भाजपचे रवींद्र भेगडे यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यांनी पुलाचे काम लवकर करण्याची मागणी केली होती. आज ही दुर्देवी घटना घडली. मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.  
 
Edited by - Priya Dixit