1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (17:42 IST)

Pune : पोहण्यासाठी गेलेली दोन तरुण इंद्रायणी नदीत बेपत्ता

Indrayani river
पिंपरी चिंचडच्या हद्दीत मोशी भागात इंद्रायणी नदी मध्ये गेलेले दोन तरुण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. शक्तिमान कुमार आणि सोनू कुमार बैठा असे या तरुणांची नावे असून दोघेही 20 वर्षाचे होते.  
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे तरुण इंद्रायणीत पोहायला गेले होते मात्र पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे हे दोघे बुडाले. ही घटना घडली तेव्हा मुलांना पोहायला जाऊ नका असे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितल्यावर देखील त्यांनी ऐकले नाही आणि ते पोहायला गेले आणि पाण्याच्या अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाले. या घटनेची  माहिती मिळतातच अग्निशमन  दल  आणि एनडीआरएफ टीम दाखल झाली. या दोन्ही तरुणांना शोधण्याचे काम अद्याप सुरु आहे. अजून ही या दोघांचा शोध लागला नाही. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली आहे. प्रकरणाचा आणि मुलाचा शोध सुरु आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit