1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (11:14 IST)

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग

Massive fire breaks out at Mandai Metro Station in Pune
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये मंडई मेट्रो स्थानकाच्या तळमजल्यावर रविवारी मध्यरात्री आग लागली. एका अधिकारींनी सोमवारी ही माहिती दिली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'वेल्डिंग'चे काम सुरू असताना आगीची घटना घडली आहे.
 
तसेच या घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने तातडीने 5 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवून आग आटोक्यात आणली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची बातमी नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनवर वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागली आहे.
 
अग्निशमन विभागाच्या अधिकारींनी सांगितले की, “आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.”
 
तसेच खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी 'X' वर पोस्ट केली की आग विझवण्यात आली असून या घटनेमुळे मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. तसेच मंडई मेट्रो स्टेशनला आग लागण्याची दुर्दैवी घटना काही वेळापूर्वी घडली होती. आगीचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या पाच अग्निशमन गाड्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली.