शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (15:51 IST)

पुणे विद्यापीठात लवकरच गणित म्युझियम सुरु होणार

लहान वयापासूनच मुलांना गणिताची गोडी लागावी यासाठी लवकरच गणित म्युझियम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केली.
 
करमळकर म्हणाले, चौथीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या गणित म्युझियम खेळाच्या माध्यमातून गणित विषय शिकविण्यात येईल. ही संकल्पना पंतप्रधान कार्यालयातून आली आहे. यासाठी भारत फोर्ज कंपनीचे बाबा कल्याणी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.
 
कोविडकाळात विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे आम्ही सकाळच्या वेळात विद्यापीठाच्या परिसरात प्रदर्शन भरविले. विद्यापीठात सकाळच्या वेळात फिरायला येणाऱ्या नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 
विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील आहे. सीफोरआयफोर प्रयोगशाळा, रिसर्च पार्क फाउंडेशन, सायन्स पार्क, स्पोर्टस कॉम्प्लेक्स असे अनेक उपक्रम त्यासाठी सातत्याने करीत आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तसेच प्र-कुलगुरू व कुलसचिव यांचे मोलाचे योगदान आहे, असेही डॉ. करमळकर यांनी सांगितले.