रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:24 IST)

म्हणून पुणे पोलीस शहर दलातील ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कार्यभार दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला

पुणे पोलीस शहर दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. यातच पुणे पोलीस शहर दलातील  4 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला कार्यभार दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताआणि सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे  यांनी काढले आहेत.
 
ज्या अधिकाऱ्यांवर कोरोना बाधित अधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. त्या अधिकाऱ्यांनी स्वत:चा पदभार सांभळून संबंधीत अधिकाऱ्यांचा पदभार सांभाळावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि त्यापुढे पदभार सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव
 
1. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे यांचा पदभार पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे भाग्यश्री नवटके यांच्याकडे असणार आहे.
 
2. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियंका नारनवरे  यांचा पदभार पोलीस उपायुक्त मुख्यालय विवेक पाटील यांच्याकडे
 
3. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील यांचा पदभार पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील यांच्याकडे
 
4. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड यांचा पदभार पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्याकडे असणार आहे.