1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. MBBS student commits suicide in Pune's Katraj area

पुण्यातील कात्रज येथे एमबीबीसीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पुण्यातील कात्रज परिसरात एका सोसायटीत आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका २१ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. माया शेखर रेड्डी(21) असे या मयत विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळात हैदराबाद, तेलंगणाची रहिवासी होती. ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. ती सध्या सुरु असलेल्या परीक्षेच्या तणावात असून यातून तिने टोकाचे पाऊल घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ती आपल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजच्या एका सोसायटीत तरुणीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती मिळतातच भारती विद्यापीठ पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तरुणी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तरुणी गंभीर अवस्थेत आणि बेशुद्ध होती.  
 घटनेनंतर पोलिसांनी तिच्या भावाकडे चौकशी केली असता, मायाचे कोणाशीही वाद किंवा भांडण झाले नसल्याचे त्याने स्पष्ट केले. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात परीक्षा सुरू असल्याने अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या प्रचंड तणावातून तिने हे कृत्य केले असावे, असा संशय भावाने व्यक्त केला असून या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले.  पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
पुढील लेख
११ सप्टेंबर रोजी देशभरातील बँकांचा संप, मागण्या पूर्ण न झाल्यास अनिश्चित काळासाठी आंदोलन