पुण्यात पेटलं विद्यार्थ्यांचं आंदोलन! 'Gen-Z' रस्त्यावर उतरताच जंतर-मंतरसारखं चित्र
महाराष्ट्रातील पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु झाले आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला असून परीक्षेतील अनियमितते विरोधात Gen-Z चा एल्गार समोर येत आहे. या सर्व आंदोलनाला पाहून जंतर-मंतरची सर्वांना अस्थावन झाली आहे. तसेच एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीतील अनियमितता आणि जागा कपातीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलने करत प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या आहे. परीक्षा योग्यरित्या घेण्यात यावी, तसेच अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात आज ७ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विराट 'आक्रोश मोर्चा' काढला आहे.
आंदोलनाची मुख्य कारणे आणि मागण्या
अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा: परीक्षांमधील सातत्याने होणारे गैरप्रकार आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
निष्पक्ष चौकशी: कथित पेपरफुटी प्रकरणांची (विशेषतः एफडीए इन्स्पेक्टर भरती परीक्षा) सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
पारदर्शकता: स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण प्रक्रियेत आणि भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणली जावी.
राजकीय पाठिंबा
रोहित पवारांचा सहभाग: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे स्वतः या आंदोलनात सहभागी झाले असून, त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले व सरकारचा निषेध केला.
सुप्रिया सुळेंची मागणी: खासदार सुप्रिया सुळे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, सरकारने तातडीने एखाद्या जबाबदार व्यक्तीला पाठवून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि यावर मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.
Edited By- Dhanashri Naik