रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 24 जुलै 2024 (18:32 IST)

पूजा खेडकरला अपंगत्वाचे प्रमाणपत्र देताना कोणताही हलगर्जीपणा नाही, रुग्णालयाचा दावा

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पुण्यातील एका रुग्णालयाने पूजा खेडकरला सात टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. ता पुन्हा एकदा रुग्णालयाच्या प्रमाणपत्राबाबत अंतर्गत चौकशी करण्यात आली आहे. प्रमाणपत्राची कागदपत्रे नियमानुसार सादर केल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणाले की, प्रमाणपत्र देताना कोणताही हलगर्जीपणा झाला नाही

पूजा खेडकर यांना  ऑगस्ट 2022 मध्ये यशवंत राव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडून अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले.पूजा खेडकरवर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखवल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरशी संबंधित कागदपत्रांची यूपीएससीकडून तपासणी केली जात आहे.

2022 मध्ये पूजा खेडकरने तिच्या डाव्या गुडघ्याच्या सांध्याबाबत अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता.
24 ऑगस्ट रोजी पूजाला एक प्रमाणपत्र जारी करण्यात आपले असून त्यात पूजाचा डावा घुडगे सात टक्के अपंगत्वाच्या श्रेणीत येण्याचा दावा केला होता. 

जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने रुग्णालयाला नोटीस पाठवली होती.नोटीसमध्ये पूजा खेडकर यांना दिलेल्या प्रमाणपत्राची अंतर्गत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रमाणपत्र देताना निष्काळजीपणा आढळून आल्यास पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

या वर रुग्णालयातून उत्तर आले गेल्या आठवड्यात आम्हाला पुणे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. यानंतर आम्ही रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी विभागाची अंतर्गत तपासणी केली. सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र नियमानुसार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ते पुढे म्हणाले की, या प्रमाणपत्रामुळे शिक्षण किंवा नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा मिळण्यास मदत होणार नाही.आमच्या तपासणीत कोणालाही कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी दोषी आढळले नाही.'
Edited By- Priya Dixit