गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (08:08 IST)

पुण्यात सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही

पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व लसीकरण केंद्रांवर आज (२२ मे) लसीकरण होणार नाही. अपुऱ्या लस साठ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल माध्यमांना माहिती दिली. पुण्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्यात आता सर्व प्रकारचे बेड्स असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आता जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर यांचा तुटवडा नसल्याचंही ते म्हणाले.याचबरोबर, ग्रामीण भागातली रुग्णसंख्या अजूनही अपेक्षेप्रमाणे आटोक्यात आली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.