गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (13:17 IST)

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा

once again problem in Gautamis program
लावणी नृत्यांगना गौतमी नेहमीच चर्चेत असते, आता पुण्याच्या खेड तालुक्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा झाला आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आदाकारीचा थरार रंगला.  यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरू झाला आणि रिमिक्स गाण्यांवर गौतमी चांगलीच थिरकली. तेव्हा तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकू लागले. मात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. यावेळी गौतमीने देखील आपला डान्सचा कार्यक्रम थांबवला. 
 
हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतर हा राडा आटोक्यात आला. त्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात सापडला.