शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (17:22 IST)

पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवार, १३ जुलैपासून पुढील १५ दिवसांसाठी पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन असणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात पुढील १५ दिवस पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल.
 
लॉकडाऊनसंबंधी लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांना काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी लॉकडाऊन कधी लागू करायचा याचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सोमवारी लागू करायचा की मंगळवारी या निर्णय मनपा आयुक्त घेणार आहेत.