मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:28 IST)

पुण्यात दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस दिला

पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.
 
यावेळी प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना करोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर हा डोस देण्यात आला.
 
लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.