1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (15:55 IST)

मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Parents do not have the mentality to send their children to school - Deputy Chief Minister Ajit Pawar Maharashtra News Pune Marathi News Webdunia Marathi
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने 4 ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु  करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणं उचित नाही. जोपर्यंत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण काही करु शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, दुसरा डोस घेतो तो व्यक्ती कोरोनाचे नियम  पाळत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मराठवाड्यातील काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत.

अजित पवार यांनी सांगितले की, मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ  जाहीर करण्याची मागणी होत आहे.परंतु त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झालेले नाहीत.राज्य सरकारने  जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त) यांना सूचना दिल्या आहेत.विमा कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. मराठवड्यात खूप नुकसान झाले आहे.याबाबत आपण माहिती घेत असून मुख्यमंत्री निर्णय घेतील.पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.