बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (23:07 IST)

पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी पास देणार येणार

आता पुणेकरांना देखील लोकल प्रवास करता येणार आहे.लशींचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना पुणे-लोणावळा लोकल प्रवासासाठी पास देणार येणार आहेत.रेल्वे पाससाठी महापालिका किंवा नगर परिषदेकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल त्यानंतरच प्रवासशांना रेल्वेकडून प्रवासासाठी पास देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे लोळणाळा मार्गावर सध्या सकाळी आणि संध्याकाळी चार लोकल सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईप्रमाणे पुणे – लोणावळा लोकल सेवा देखील पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.
 
मुंबईनंतर पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांना पुणे लोणावळा लोकल प्रवास सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यशासनाच्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लशींचे दोन डोस घेतलेल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाठी पास किंवा तिकीट देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
 
मुंबईत १५ ऑगस्टपासून क्यूआर कोड पद्धत लागू करण्यात आली असली तरी पुण्यात मात्र यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी क्यूआर कोड उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र आता सर्वसामान्य पुणेकरांचे लशींचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांना देखील ओळखपत्र म्हणून क्यूआर कोड देण्यात येणार आहे. क्यूआर कोड मिळवण्यासाठी लशींचे दोन डोस पूर्ण झालेचे प्रमाणपत्र स्थानिक प्रशासनाकडे देऊन त्यांच्याकडून ओळखपत्र घ्यावे लागणार आहे. मात्र यासाठी लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.