शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (16:05 IST)

पीएमआरडी निवडणुका निकाल जाहीर : भाजप -राष्ट्रवादीचा विजय, कांग्रेस पक्ष पराभूत

पुणे महानगर नियोजन समितीच्या(PMRDA) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 तर शिवसेनाचे 1 उमेदवार निवडून आले आहे. काँग्रेसच्या एकमेव उमेदवार चंदूशेठ कदम यांना पराभव पत्करावा लागला.     
आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते. पुणे व  पिंपरी- चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 30 जागांसाठी ही निवडणूक झाली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील काँग्रेसचे एकही सदस्य निवडून येणे अशक्य होते कारण काँग्रेसची संख्याबळ कमी होती. पुण्यात जरी काँग्रेसचे 10 नगरसेवक आहे पण पिंपरीत एक ही नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी या साठी पालक मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला एक जागा दिली होती. पुण्यातील चंदूशेठ यांनी उमेदवारी अर्ज भरला .या निवडणुकांसाठी शिवसेनेकडे पुण्यात 10 आणि पिंपरी- चिंचवड मध्ये एकूण 19 मते होती. भाजप  कडे 172 मते होती. भाजपचे या निवडणुकीसाठी 14 उमेदवार होते.ते सर्व विजयी झाले. हा निकाल 100 टक्के भाजपच्या बाजूने लागल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.