शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (20:36 IST)

कागद्पत्रावरून पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार!

सध्या आयएएस पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरु असून आता पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी  पूजाचे आई वडील गायब आहे. 
पूजाने एमबीबीएसचे शिक्षण पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून घेतले असून तिने प्रवेश घेताना कोठेही आजार नसल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.

तिचे वडील क्लासवन अधिकारी असून तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर केलं असल्याचे उघडकीस झाले आहे. तिने वैद्यकीय शिक्षण घेताना तिचे नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंदवले आहे. 

पूजाने आयएएस होण्यासाठी यूपीएससी कडे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवली.मात्र तिने एमबीबीएस मध्ये प्रवेश घेताना कोणतेही दिव्यांगचे प्रमाणपत्र दिले नाही. तिने त्यात फिट असल्याचे संगितले आहे. 
मग आता तिच्या दिव्यांग पणा कसा  काय आला यावर प्रश्न उदभवत आहे.
 
Edited by - Priya Dixit